नगरसेवकांसाठी विकास कामांच्या मागणीची दखल घेत भरीव तरतूद
नाशिक मिरर वेबटीम : नाशिक महानगरपालिकेचे सन 2021- 22 या आर्थिक वर्षाचे 2361.56 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केले. विशेष म्हणजे यंदा इलेक्शन आहे.त्यामुळे कोणत्याही प्रकारची करवाढ आणि दरवाढ नसलेले अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सर्व नगरसेवकांसाठी विकास कामांच्या मागणीची दखल घेत सुमारे भांडवली कामांसाठी भरीव तरतूद केली आहे.बुधवारी (दि. 17) आयुक्त कैलास जाधव यांनी स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांना सादर केले.या अंदाजपत्रकात महापालिकेच्या बिटको रुग्णालयाचे संदर्भ सेवा रुग्णालय रूपांतर करण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट स्कूल या प्रकल्पासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे.
या अंदाजपत्रकात घर पट्टी वाढविण्यात आली नसली तरी वापरानुसार पाणी पट्टीचे दर असावेत अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. त्यासाठी टेलीस्कोपीक जलमापकाची सूचनाही आयुक्तांनी केली आहे.
अंदाज पत्रकात शहरातील रस्ते विकासासाठी 210 कोटी रुपये, पाणी पुरवठा विभागासाठी 127 कोटी रुपये तर विद्युत व्यवस्थेसाठी 25 कोटी 74 लाख रुपयांची तरतूद धरण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण विभागासाठी 32 कोटी 63 कोटी रुपयांची तरतूद, शिक्षण विभागासाठी 133 कोटी 45 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तसेच बस सेवेसाठी 102 कोटींचीत तरतूद करण्यात आली आहे, नगरसेवकांना प्रभागातील कामे करण्यासाठी प्रत्येकी 40 लाख मिळणार आहेत.
