नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील भिवानंद काळे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती नाशिक जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असतांना अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स मानव अधिकार मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने पारोळा या ठिकाणी “राज्यस्तरीय अभ्यास शिबीर” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी अनेक जिल्ह्यात संघटना बळकट करण्यासाठी सक्षम पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. त्यात नाशिक जिल्ह्यातील माजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,पोलीस आयुक्तालय शांतता कमिटी सदस्य,तसेच आधुनिक महाराष्ट्र चित्रपट संघटना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख,आणि दिल्ली येथे बाबासाहेब आंबेडकर फेलोशीप पुरस्कार तर येवला येथे नेहरु युवा पुरस्काराने सन्मानित झालेले स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणारे.तेंव्हा त्यांनी आपल्या भाषणात बोलतांना नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली.त्या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. प्रदीप पाटील खंडापूरकर,राष्ट्रीय समनव्यक श्री.गिरीराज महिराश महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष रानीताई स्वामी,पूजा नीचळे,महाराष्ट्र राज्य.विधी विभाग अध्यक्ष ऍड.विजयकुमार पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हितेश दाभाडे,पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खंडागळे कामगार विभाग अध्यक्ष भीमा जमादार पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल बोराडे, संयोजक गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेश पाटील, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रवीण बोरसे,गनी शाह,महिला जि अध्यक्ष जळगाव माधुरीताई पाटिल ,लघुउद्योग संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिपक मन्ड़लिक ,जिल्हा अध्यक्ष अंजली सोनवणे
तसेच येवला ता.महिला कार्याध्यक्ष निर्मला बुल्हे,महिला ता उपाध्यक्ष शोभा जऱ्हाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Don`t copy text!