नाशिक मिरर वेबटीम : जनता विद्यालय सातपूर या शाळेतील इयत्ता १० ची सन १९९० -९१ या वर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा ३० वर्षांनंतर स्नेह मेळावा निसर्गरम्य ठिकाण सावना ऍग्रो रिसॉर्ट रायगड नगर ,विल्लोळी नाशिक येथे संपन्न झाला.कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सर्वांचे स्वागत व त्यानंतर सरस्वती पूजनाने झाली. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन सर्व माझी शिक्षकांच्या हाताने
संपन्न झाले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन निलेश तिवारी यांनी केले. सर्व माजी विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. आपल्या मनोगतातून शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन भूतकाळातील आठवणी जागृत केल्या. त्यानंतर सर्व माजी शिक्षक सौ पी एम मुंढे , व्ही एम जाधव, एस बी कवडे, व्ही व्ही शिंदे, एस एस घाटोळ, सी बी पवार, के के आहेर, डी टी कोल्हे, एस बी महाले , एस व्ही भिडे, आदी शिक्षवृंदा नी भाषण केले. त्यांनंतर त्याचा स्मृतिचिन्ह सन्मान पत्र, शाल ,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थी ,मित्र ,मैत्रिणी यांच्यासाठी गप्पागोष्टी, अंताक्षरी, व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मधील मुंबई ,अलिबाग, सातारा ,बीड, पुणे ,कोल्हापूर ,औरंगाबाद आशा विविध भागातून विद्यार्थी उपस्थित होते. दीपक निर्वाण यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश तिवारी, गोरख शिंदे ,राजू जाधव ,दीपक परदेशी, दीपक निर्वाण ,राजेश दिवे, संदीप जाधव, सदानंद नाईकवाडी, सुजित महाले ,अरुण गीते ,निवृत्ती इंगोले, निवृत्ती बल्लाळ, रवींद्र धनाइत, सुनील आहिरे, प्रमोद विधाते, योगेश गवांदे, रामदास भोंग, प्रवीण महाजन ,किरण फोकणे, प्रवीण कुशारे ,प्रशांत पेठकर ,प्रवीण पाटील, यांनी परिश्रम घेतले.

बातम्या

Don`t copy text!