उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २३१ ने घट

सद्यस्थितीत २ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक मिरर वेेेबटिम : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९० हजार ४७९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून , सद्यस्थितीत २ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २३१ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत १ हजार ६९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

आज रोजी उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १०९, चांदवड ४०,

सिन्नर २१८,दिंडोरी ७८, निफाड १०७, देवळा ०५,

नांदगांव ६६, येवला १२, त्र्यंबकेश्वर १४, सुरगाणा ०३,

पेठ ०२, कळवण ०६, बागलाण ३८, इगतपुरी २६,

मालेगांव ग्रामीण ४० असे एकूण ७६४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सूरु आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ०४२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२२ तर नाशिक जिल्ह्याबाहेरील ०७ असे एकूण २ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ९५ हजार ११० रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी : जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.९४, टक्के, नाशिक शहरात ९५.३७ टक्के, मालेगाव मध्ये ९३.०६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.७९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.१३ इतके आहे.

एकूण मृत्यु :

नाशिक ग्रामीण ६१६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८७४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६८ व जिल्हा बाहेरील ३८ अशा एकूण १ हजार ६९६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️९५ हजार ११० कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९० हजार ४७९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ९३५ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण
९५.१३ टक्के.

*(वरील आकडेवारी आज दि.७ नोव्हेंबर सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*

 

बातम्या

Don`t copy text!