नाशिक मिरर वेबटीम : भारतीय जनता पार्टी सिडको मंडल, नाशिक महानगर यांच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ” बेटी बचाव बेटी पढाव” या उपक्रमांतर्गत नाशिक शहर स्तरीय महिला निबंध लेखन स्पर्धेत चुंचाळे मनपा शाळेच्या शिक्षिका हेमलता शांताराम भामरे यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला.
केंद्र सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमांतर्गत महिलांचा सामाजिक स्तर उंचावण्याच्या हेतूने सिडको मंडलाने आयोजित केलेल्या या महिलांसाठीच्या निबंध स्पर्धेत 35 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी ‘सावित्रीबाई फुले यांचा पुनर्जन्म झाला तर ‘, हा विषय देण्यात आला होता. भाजपाच्या शहर कार्यालयात भाजपाचे बेटी बचाव बेटी अभियानाचे महा संघटक डॉ.राजेंद्र फडके, आमदार देवयानी फरांदे, मा.आ. बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, स्पर्धेच्या संयोजिका डॉ. श्रुती पालखेडकर , डॉ. चेतना दहिवेलकर, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, जगन पाटील डॉ.चंचल साबळे यांच्या हस्ते विजेत्यांचा श सन्मानचिन्ह गौरवपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
बेटी बचाव बेटी पढाव निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत…
प्रथम पारितोषिक- हेमलता शांताराम भामरे.
द्वितीय पारितोषिक- डॉ. तेजश्री शिंदे.
तृतीय पारितोषिक- सौ कांचन महानुभाव.
चौथे पारितोषिक- ज्योती नेहे .
पाचवे पारितोषिक- डॉ. प्रतिभा पलोड.
