नाशिक मिरर :
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काल कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात झालेले आंदोलन हे सकल मराठा समाजाचे असून या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव व मराठा समाजातील संघटना, समाजातील लोकप्रतिनिधी उपस्थित असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कालच आंदोलन हे भाजपप्रणीत असल्याचा बिनबुडाचा आरोप केला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वय करण गायकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नांदेड येथे काल छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात भव्य मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजप खासदार हेमंत पाटील, शिवसेना आमदार राम पाटील रातोळीकर ,भाजप आमदार मोहन अण्णा हंबर्डे , काँग्रेस आमदार माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेस आमदार तुषार राठोड,भीमराव केराम भाजप आमदार बालाजीराव कल्याणकर, शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेस महापौर मोहिनी येवणकर,काँग्रेस पक्षाचे तिनेही जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे तिनेही जिल्हाध्यक्ष , भाजपचे चारीही जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, यांच्यासह विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मराठा समाजातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी माजी आमदार,स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच ,चेअरमन यांच्यासह मराठा समाजातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशोकराव चव्हाण यांनी मराठा समाजाच्या हिताचे काम करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. समाज स्वागतच करेल अन्यथा समाजाच्या कार्यक्रमाला यापुढे उपस्थित नाही राहिले , तर समाज योग्य धडा त्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही, समाजातील तरुण समाज बांधवात यांची जागृती मोठ्या प्रमाणावर झाली असून समाजाला आरक्षणाची झळ मोठ्या प्रमाणावर बसत आहे. यामुळेच यापुढील काळात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजासाठी जे लोकप्रतिनिधी काम करतील त्यांच्या बाजूने राहणार व नाही आले त्यांना योग्य ते धडा शिकवल्याशिवाय समाज गप्प बसणार नाही, यांचा हेतू इतका चांगला होता तर यांनी आदल्या दिवशी नांदेडहून मुंबईला न जाता त्या ठिकाणी थांबून मराठा समाजाबद्दल आपले मत आपले भावना काय आहे हे स्पष्ट करायला पाहिजे होते परंतु तसे न करता ते मुंबईला निघून गेले त्यावेळी यांचे समाज प्रेम जागे झाले नाही. छत्रपतींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन बोलतात की भारतीय जनता पार्टीने लोकसभेत छत्रपती संभाजीराजे यांना बोलू दिले नाही त्यांना विरोधी पक्षांनी मदत केली. आणि लगेच पलटी मारताना बोलतात की नांदेडमध्ये झालेले आंदोलन हे भाजप प्रणित आहेत याचा अर्थ मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा नांदेड चे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेता केवळ आपल्यावर येऊ नये यांसाठीच सकल मराठा समाजाच्या मोर्च्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याची माहिती करण गायकर मराठा क्रांती राज्य समन्वयक दिली आहे.

बातम्या

Don`t copy text!