जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ९४ हजार ९३४ रुग्ण कोरोनामुक्त
नाशिक मिरर :
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ९३४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ९९४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २८ ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ५५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २४, बागलाण २६, चांदवड ३३, देवळा ११, दिंडोरी १६, इगतपुरी १०, कळवण ०२, मालेगाव २८, नांदगाव १९, निफाड ७४, पेठ ००, सिन्नर १४१, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ००, येवला ३८ असे एकूण ४२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५२२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४१ तर जिल्ह्याबाहेरील ०८ रुग्ण असून असे एकूण ९९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ४८६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.०४ टक्के, नाशिक शहरात ९८.०४ टक्के, मालेगाव मध्ये ९६.८४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ इतके आहे.
एकूण मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार ११४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९६१ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ५५८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
◼️४ लाख ४ हजार ४८६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ९४ हजार ९३४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ९९४ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के.
दिनांक: 21 ऑगस्ट 2021 नाशिक
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 103
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 118
नाशिक मनपा- 30
नाशिक ग्रामीण- 86
मालेगाव मनपा- 01
जिल्हा बाह्य- 01
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8559
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)
