वर्षभरात उभी राहणार सातपूर कॉलनी मध्ये प्रशस्त पोस्ट कार्यालयाची वास्तू
नाशिक मिरर : 
            गेली २० वर्षापासून प्रलंबित असलेला सातपूर येथील प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न सुटला आहे.सदर कामाचा भूमिपूजन कार्यक्रम खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार सीमा हिरे, नगरसेवक सलीम शेख, सभापती योगेश शेवरे, मधुकर जाधव, नगरसेविका सीमा निगळ,दीक्षा लोंढे,उपस्थित होते.
     सातपूर वासियांच्या २० वर्षापासूनची मागणी लक्षात घेवून खासदार हेमंत गोडसे यांनी पोस्ट ऑफिस उभारणीसाठी लागणाऱ्या विविध विभागांचे ना – हरकत दाखले मिळवून व निधी मंजूर करून घेतल्याने प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारतीच्या बांधकामाचा मार्ग दोन महिन्यांपूर्वीच मोकळा झाला होता. शनिवार गोडसे यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
         गेल्या वर्षानुवर्षे रखडलेल्या टपाल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याने सातपुर वासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशोकनगर मधील राज्य कर्मचारी वसाहतीच्या दोन खोल्या मध्ये भाडेतत्ववर सुरू असलेले पोस्ट ऑफिस मध्ये कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैर सोय होत होती.नागरिकांना उभे राहण्यास व वाहने पार्किंग करण्यास देखील जागा नव्हती, पोस्ट ऑफिस मध्ये केंद्र शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत.त्यामुळे सदर ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी राहत असे.त्यामुळे नगरसेवक सलीम शेख, कै. मा नगरसेवक अशोक गवळी,व नरेंद्र पुणतांबेकर,जेष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे यांनी देखील पोस्ट कार्यालय उभारणी साठी अनेकदा प्रयत्न व पाठपुरावा केला. परंतु तांत्रिक बाबी व निधी अभावी सदर पोस्ट कार्यालय चे लालफिती मध्ये अडकत होते.
       परिसरातील जेष्ठ नागरिकांनी खा.गोडसे यांच्या कडे पोस्ट ऑफिस राखीव जागेवर पोस्ट ऑफिस उभारणी साठी अनेकदा मागणी केली होती.त्यानुसार खा.गोडसे यांनी शासन दरबारी सर्व अडचणी दूर करत एकूण ५० लाख रुपये सदर पोस्ट ऑफिस ची वास्तू साठी निधी मंजूर झाला असून, ग्राउंड फ्लोअर व फस्ट फ्लोअर अशी रचना असलेली इमारत वर्षभरात च उभी राहणार आहे.असे खा.गोडसे यांनी यावेळी सांगितले. यावेळी पोस्ट ऑफिस चे मोहन अहिरराव, एस.यु. पाटील, एम.बी.रुळे, व्ही.टी. निकम,एम.आर देवरे, बि.जी.कराड, वि.एन.कटाळे, वि.एस.पोटे,अमितेशकुमार अधिकारी व कर्मचारी,शिवसेना, पदाधिकारी देवा जाधव गोकुळ निगळ , नरेश सोनवणे , युवराज धात्रक , विलास आहेर , योगेश गांगुर्डे . आनंद दिघोळे ,  चारुदत्त आहेर, किशोर निकम , चेतन उगले , यशवंत पवार,साहेबराव पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!