नाशिक मिरर : 

अवघ्या १० दिवसांवर गणेशउत्सव आला आहे. परंतु यावेळी देखील गणेश उत्सव वर मागील वर्षी प्रमाणे च कोरोना चे सावड आहे.ते अजून नाहीसे झालेले नाही.त्यामुळे शासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दि.३१ रोजी सातपूर विभागीय कार्यालयात सभापती योगेश शेवरे व यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी नगरसेवक सलीम शेख, नगरसेविका हेमलता कांडेकर, नगरसेविका इंदुबाई नागरे, माजी सभापती रवींद्र धिवरे,सातपूर विभागीय अधिकारी नितीन नेर, सामान्य प्रशासनाचे तानाजी निगळं, विदयुत विभागाचे खान, पाणी पुरवठाचे पाटील,सुभाष आहेर, गार्डन विभागाचे लोखंडे, तसेच अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक सलीम शेख यांनी गणेश उत्सव निमित्त अधिकारी यांना सूचना केल्या. तसेच मागील वर्षी गणेशोत्सव काळात सोमेश्वर परिसरात गोदावरी नदीत एका माणसाचा पाण्यात वाहून मृत्यू झाला होता. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी.तसेच सातपूर विभागातील सर्व खाजगी मोकळ्या प्लॉट मालकाला नोटीस काढून जागेची साफसफाई करण्याची सूचना करावी. सध्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया रुग्ण वाढत असून सणासुदीच्या काळात यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.असे नगरसेवक शेख यांनी मनपा कर्मचारी यांना सूचना केली. तसेच गणेश उत्सव निमित्त नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करावा, गर्दी करू नये अशी विनंती केली.

सभापती योगेश शेवरे यांनी सर्व अधिकारी यांना गणेशोत्सव काळात कामात कसूर करू नये, अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे सभापती शेवरे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.हेमलता कांडेकर नगरसेविका यांनी प्रभाग क्रमांक ९ मधील श्रमिक नगर येथेही कुत्रिम तलाव, निर्मल्य टाकण्यासाठी जागा उपलबध करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.

बातम्या

Don`t copy text!