नाशिक मिरर :
अंबड लिंक रोड येथील कारगिल चौक येथे २५ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गवळी ( वय २५ ) रा. कारगील चौक याच्यावर मंगळवारी रात्री पावने दहा वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणा वरून तीन तरुणांनी प्राणघातक हल्ला करत धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात राहुलचा जागीच मृत्यू झाला आहे. राहुल हा सेट्रलिंग चे काम करत होता. घटनास्थली पोलिस अधिकारी दाखल झाले आहे याप्रकरणी अंबड पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.
