नाशिक मिरर :

सातपूर परिसरातील त्र्यंबक- गंगापूरलिंकरोड वरील श्रमिकनगर बस थांबा बॅनरबाजी व जाहिरात बाजी मुख्य ठिकाण बनले आहे.त्यामुळे आता बसथांब्यावर बस वाट पाहणारे प्रवाशी देखील बस थांबा नव्हे बॅनरबाजी ठिकाण आहे.असे उपवासात्मक पणे सांगत आहे. नाशिक मनपाची सिटीलिंक बस सेवा सुरू झाल्याने सातपूर मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु श्रमिक नगर येथील महिंद्रा कंपनीच्या भिंती लगत असलेला मुख्य बसथांबा स्थानिक नगरसेवक, भावी नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,भाऊ,दादा, आप्पा ,आण्णा यांच्या फलक व जाहिरात बाजीचे मुख्य ठिकाण ठरत आहे.

 

वाढदिवस असो वो महात्मा, संत, थोर समाजसुधारक यांची जयंती व पुण्यतिथी इतर कोणताही कार्यक्रमचे फलक श्रमिकनगर बसथांब्यावर झळकलेले बघायला मिळते. परंतु परिसरातील सुजाण लोकप्रतिनिधी व विविध पक्षाचे पदाधिकारी यांना सदर बसथांबा हे परिसरातील नागरिकांच्या सुविधा साठी असून फलकबाजी साठी नव्हे इतकी सरळ गोष्ट देखील लक्षात येत नसल्याने दिसून येत आहे. नागरिक देखील देखील भीती पोटी मूग गिळून गप्प आहेत. सदर बॅनरबाजीमुळे समोर आलेली बस देखील बसथांब्या वर बसची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना दिसत नाही.त्यामुळे पर्यायाने ऊन असो वा पाऊस यांचा सामना करत रस्तावर तासनतास बस वाट पाहत असल्याचे दिसून येते.

हे कमी की काय सदर बसथांब्याच्या बाहेरच महिंद्रा कंपनीला कच्चा माल पुरवणारे मालवाहतूक कंटेंनर, आयसर उभे असतात. समोरून येणारी बस दिसली नाही.अचानक बस समोर गेल्यास भविष्यात यामुळे मोठी दृघटना घडल्यास यांस जबाबदार कोण? असा सवाल देखील यामुळे उभा राहिला आहे. सदर प्रकाराकडे मनपा प्रशासनाने देखील दृलक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. सदर बसथांब्या वर श्रमिकनगर, गंगासागरनगर, माळी कॉलनी, राधाकृष्णनगर, सातमाऊली, संभाजीनगर भागातील रोज शेकडो नागिरक सदर ठिकाणावरून प्रवास करतात. त्यामुळे परिसरातील नागिरक व प्रवाशांनी सदर ठिकाणी फलकबाजी न करण्याची मागणी व विनंती मनपा प्रशासन व सुजाण लोकप्रतिनिधी कडे केली आहे.

बसथांबे झाले बेरंग :
शिवाजीनगर ,श्रमिकनगर, अशोकनगर, सावरकरनगर, सातपूरकॉलनी येथील बसथांबे बेरंग झाले आहेत.तर काही बस थांबे नादुरुस्त आहेत.तर काही बसथांब्या चा वापर रात्री मद्यपी दारू पिण्या साठी करतात.त्यामुळे सदर बसथांब्याची दुरुस्ती व रंगरोगोटी करून बस थांब्या नावे पुसून गेल्याने त्याचे नामकरण करण्याची मागणी नागरिकांनी मनपा सभापती योगेश शेवरे यांच्याकडे केली आहे.

बातम्या

Don`t copy text!