ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विवाहित इसमाचा मृत्यू 
सातपूर : नाशिक मिरर वेबटीम येथील विश्वासनगर मध्ये कौटुंबिक झालेल्या वादातून जबर मारहानीत एकाचा हत्या झाल्याची घटना ऐन दिवाळीत घडली आहे.सातपुर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार समलदेव रामसिन्गार यादव (32) रा. विश्वासनगर,हनुमान मंदिराजवळ,पंकज झा घरमालक यांच्या घरात राहणारे भाडेकरू हे दि.१४ तारखेला लक्ष्मीपूजन च्या रात्री ११ वाजेच्या सुमाराला जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर पडले असता, संशयित आरोपी सुकट मोहदन चौहान (वय ५८) याने मागील कौटुंबिक वादा वरून यादव यांस मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मयत झालेले समलदेव रामसिन्गार यादव यांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुकट चौहान याला पाठीमागून घट्ट विळखा घातला होतो, त्यांच वेेळी सुकट चौहान यांचा मुलगा संजय सुकट चौहान (वय २९) व संदीप सुकट चौहान यानी मुठ नसलेली क्रिकेटच्या बैट समलदेव रामसिन्गार यादव यांच्या डोक्यात मारल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यावर तात्काळ पत्नीसह काही नागरिकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. परंतु समलदेव यादव यांचा उपचार दरम्यान सकाळी दहा वाजता आज दि.१८ रोजी मृत्यू झाला.
सातपुर पोलिसानी गुन्हा दाखल केला असता, दोघे स्वताहून पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.तर एकास  त्र्यंबकेश्वर येथून अटक करण्यात आली आहे.  मागील कौटुंबिक वादातून झालेल्या  खुनातील संशयित तिघा संशयित आरोपीना काल न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.या खुनाचा आधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरिक्षक  तुळशीराम राठोड करीत आहेत.

बातम्या

Don`t copy text!