नाशिक मिरर वेबटीम : नाशिक शहरात गरीब गरजू नागरिकांना थंडी मध्ये सार्वजनिक वाटपा करता गोधडी शिवून हव्या आहेत.यातून सदर महिलांना मोबदला व रोजगार देण्यात येणार आहे.वरील उपक्रमात 100 महिलांना सहभागी करण्यात येणार आहे. गोधडी शिवण्या करता लागणारे मटेरियल साडी ,आत टाकायचे जुने कपडे तसेच सुई, धागा आमच्या तर्फे देण्यात येईल.

याकरता एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात येईल. त्याच्यात उत्तम गोधडी शिवायचे प्रात्यक्षिक दिले जाईल .तसेच एक गोधडी कार्यशाळेच्या ठिकाणी शिवून घेतली जाईल. त्यानंतर गोधडी शिवणे करता संबंधित महिलांना मटेरियल दिले जाईल. गोधडी शिवण्याचे उचित मानधन दिले जाईल.

Covid-19 मुळे बेरोजगार झालेल्या महिलांना कामाची संधी देणे, त्यांची क्रयशक्ती वाढवणे तसेच या महिलांना एकत्र आणून कायमस्वरूपी गट स्थापन करून गोधडी शिवण्याची व्यवसायाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.शिवलेल्या गोधड्या दुर्गम, आदिवासी भागात ,झोपडपट्ट्यांमध्ये तसेच गरजवंताला मोफत वाटण्यात येतील तसेच ज्यांना घरगुती वापराकरता तसेच सार्वजनिक वाटपाकरता गोधडी हवी असतील त्यांनी साडी मटेरियल व महिलांचे गोधडी शिवण्याचे मानधन दिल्यास त्यांनाही गोधडी तयार करून देण्यात येतील.

ज्या महिलांना गोधडी शिवण्याच्या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्राचार्य प्रशांत पाटील 9545453233 या क्रमांकावर संपर्क साधावा.
सदर उपक्रमाचे आयोजन प्राचार्य प्रशांत पाटील, विजय बाविस्कर,कैलास पाटील , हेमंतआप्पा धात्रक ,मिलिंद जाधव ,दिलीप भामरे,विजय बाविस्कर ,संजय लोंढे, राजेंद्र कलाल ,अजित पाटील, डॉ राजेंद्र नेहेते , डॉ भरत केळकर, नानासाहेब सोनवणे, रामदास सूर्यवंशी,रवींद्र पाटील, डॉ उल्हास कुटे ,समीर रकटे ,रवींद्र बागुल , नंदू आबा शिंदे,महेंद्र बच्छाव, सुधाकर सिसोदे ,नरेंद्र गिरासे , शरद पाटील,ऋषिणेश बागल, वीरपाल गिरासे यांनी केले आहे.

बातम्या

Don`t copy text!