जीवित हानी झाल्यावर कामपूर्ण होणार का? वाहनचालकाचा सवाल
नाशिक मिरर :
त्र्यंबक-गंगापूररोड वरील अशोकनगर रस्त्या वर सुरू असलेल्या दुभाजकाचे काम वाहनचालक व नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.दि. २ सप्टेंबर गुरुवार रोजी शिवाजीनगर जवळील कार्बन नाका येथे सुरू असलेल्या दुभाजकाच्या काम वरील नवीन बनवलेल्या दुभाजका वर चक्क नाशिक महानगरपालिकेच्या मनपा ठेकेदाराची महिंद्रा पिकअप एम.एच १५ ई.जी ७५५१ चढून गेली. सदर पिकअप जेसीबी च्या साहाय्याने हटविण्यात आली. सदर महिन्यातील ही दूसरी घटना असून, धीम्यागतीने व नियोजन शून्य सुरू असलेल्या कामा मुळे सदर अपघात होत आहे.
सातपूर औद्योगिक वसाहती मुख्य रस्ता दुभाजकामुळे अरुंद झाला आहे.अरुंद रस्त्यावर दुभाजकाचे काम सहा महिन्या पासून सुरू आहे.महानगरपालिकेच्या मालकीचे वाहनांनाच रहदारी साठी इतकी अडचण सहन करावी लागत असून भविष्यात सदररस्त्यावर समस्या व अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमणात वाढणार आहे. राज रेसिडेन्सी व कडेपठार चौक येथील लोक वस्तीकडुन येणाऱ्या मुख्य रस्ता समोरच दुभाजक टाकण्यात आले आहे. सदर दुभाजक कामात त्रुटी दिसून येत आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून सदर कामामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर मनपा प्रशासन जागी होणार आहे का? असा सवाल घटनास्थळी उपस्थित सातपूर विभागाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांनी केला आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी व काम त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी यावेळी वाहनचालकानी केली आहे.

