नाशिक मिरर :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातपूर विभागाच्या वतीने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे भाविकांसाठी खुली करावी यासाठी सातपूर मधील दक्षिणमुखी श्री साईनाथ महाराज मंदिर सातपूर कॉलनी येथे घंटानाद व आरती करून महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला.जनता कोविडच्या संकटाने त्रस्त असून, मानसिक दृष्ट्या शांती आणि शक्ती देणारी श्रद्धा स्थान बंद आहेत , जनतेच्या भावनांचा विचार करून सरकारने मंदिरे खुली करावी अन्यथा नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून
जन आक्रोश आंदोलन उभे करतील असा इशारा यावेळी उपस्थित मनसे पदाधिकारी यांनी दिला.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, सातपूर प्रभाग सभापती तथा नगरसेवक योगेश शेवरे, सातपूर विभागीय अध्यक्ष- योगेश लभडे, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा,विजय अहिरे, शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, मिलिंद कांबळे, शहर प्रवक्ता अंबादास आहिरे, महिला जिल्हाध्यक्ष कामिनी दोंदे, महिला विभाग अध्यक्ष आरती खिराडकर, पश्चिम विभाग विधानसभा निरीक्षक अनिता ठोक, व निर्मला पवार,महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक वैभव महिरे, निशांत शेट्टी , विशाल भावले, प्रवीण अहिरे, लक्ष्मण साळवे, राम बिडवे, गणेश जायभावे, सागर निगळ, सतीश वाघ, अक्षय भदाणे, जयेंद्र खरात, निखिल सिन्हा, मोहम्मद जिलानी, अनिकेत सिन्हा,व ज्येष्ठ नागरिक व साईभक्त उपस्थित होते.

 

बातम्या

Don`t copy text!