सातपूर :नाशिक मिरर वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक १० मधील पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील तिरडशेठकडे जाणाऱ्या पुलाचे लोकार्पण माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या पूलाचे काम माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांच्या विशेष प्रयत्नातून व नाशिक महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून तब्बल एक कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण झाले आहे. या पुलामुळे पिंपळगाव बहुला व तिरडशेठ गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.

पिंपळगाव परिसरातील शेतकरी व नागरिक आपली शेती कसण्यासाठी या पुलाचा वापर करतात. तिरडशेठ गावासाठी हा पूल मुख्य रस्त्याचा पर्याय असून, पूल नसल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, इंदुबाई नागरे यांच्या पुढाकारातून आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे.

 

लोकार्पण सोहळा साजरा करताना इंदुबाई नागरे यांच्या हस्ते फीत कापून पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पिंपळगाव व तिरडशेठ गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला युवा नेते सार्थक विक्रम नागरे, रवी पालवे,अरुण नागरे, रघुनाथ नागरे, गोकुळ गामणे, संजय गामणे, संतोष पेंढेकर, अमित बोकड, शाम गांगुर्डे, यांची उपस्थिती होती.

बातम्या

Don`t copy text!