हॉटेल गुरुकृपा समोर करण्यात आली कारवाई 

नाशिक मिरर  : येथील त्र्यंबक रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आयशर ट्रक मध्ये अवैध मद्य विक्री करणाऱ्या वाहनावर कारवाई करत तब्बल तीस लाख रुपये रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे गुरुकृपा समोर त्रंबक नाशिक रोडवर सापळा लावून परराज्यात निर्मित अवैध मद्य साठा करणाऱ्या ट्रकला ताब्यात घेण्यात आले आहे.

ट्रक क्रमांक एम एच 15 जी व्ही 1914 या मध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशात विक्री करण्यास परवानगी असलेल्या ट्रक मध्ये सहा तीस लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे या दरम्यान संशयित कासीम इम्रान उद्दीन अहमद,दीपक गणपत रोकडे यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान अवैध मद्यसाठा असलेले 200 बॉक्स जप्त करण्यात आले.या कारवाईत ठाकूर, एम आर तेलंगे,हेमंत नेहरे, किरण कदम, गोकुळ परदेशी, रमाकांत यांनी सहभाग घेतला.

बातम्या

Don`t copy text!