नाशिक मिरर : वृत्तसेवा येथील अशोकनगर परिसरात राहणारा युवक वीज तारेला अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्नात शुभम जाधव (वय २४ रा.उमाकुंज अपार्टमेंट विश्वास नगर अशोक नगर ) येथील युवक सोमवार दि १५ रोजी सायं. ५ वाजेच्या सुमारास शॉक लागून ५० टक्के भाजला आहे. प्रकृती गंभीर असून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
सदर युवक कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो.शुभम हा
आई सह भाडेतत्वावर अशोकनगर मध्ये राहत होते. गणेश बोलकर भाजप उपाध्यक्ष नाशिक यांनी सदर युवकांस आमदार सीमा हिरे यांच्याशी संपर्क करून युवकांच्या पुढील उपचारासाठी खाजगी मोठ्या दवाखान्यात शिप्ट करणार असल्याची अधिक माहिती यावेळी दिली.

