नाशिक मिरर : वृत्तसेवा
येथील श्रमिकनगर मधील गायत्री स्वीट्स या दुकानात गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुकान मालकाने तात्काळ सदर पेटते सिलेंटर उचलून बाहेर मोकळ्या जागेत आणले.पाणी व पोत्याच्या साहाय्याने विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु सिलेंटर काही विझत नव्हते.
दुकानातील कामगाराने अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने पावडर फवरा मारून आग वेळीच आटोक्यात आणली. सदर स्वीट्स च्या दुकानास वर्षभरा पूर्वी देखील शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली होती. यामध्ये पूर्ण दुकान जळून खाक झाले होते. आसपास सर्व परिसर हा व्यवसायिक असल्याने ग्राहकांची नेहमी गर्दी असते. मोठी दुर्घटना ठळल्या मुळे नागरिकांनी मोकळा श्वास सोडला.

