नाशिक मिरर :वृत्तसेवा

        सातपूर येथील अशोकनगर मधील राधाकृष्णनगर मध्ये राधाकृष्ण सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळाच्या वतीने कुंदकेश्वर मनोकामना शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन दि. २४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. दि. २४ जाने. रोजी सकाळी ८ वाजेला पूजा, प्राणप्रतिष्ठा. कलशयात्रा, मंडळ स्थापना पूजा, अभिषेक, होम, आरती अधिवास आणि स्थापना होणार आहे. दि.२५ रोजी महाअभिषेक, मिरवणूक दि.२६ जाने. रोजी रुद्राअभिषेक, हवन व देणगीदार व मान्यवराचा सत्कार करण्यात येणार आहे.

        तसेच दु.१२ ते ५ वा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.शिवलिंग मंदिर उभारणी व परिसर सुशोभीकरण साठी परिसरातील नागरिक सातपूर शहर परिसरातील विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी यांनी मदत केली आहे. यांसर्वांचे आभार व्यक्त करत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान सांगळे यांनी धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान सातपूर परिसरातील नागरिकांना केले आहे.

 

बातम्या

Don`t copy text!