नाशिक मिरर :

सातपूरकरानो सावधान सातपूर मध्ये चोरटे व दरोडे खोरांचा सुळसुळाट झाला असून गुन्हेगाराचा शोध घेण्यास सातपूर व नाशिक पोलीस अपयशी ठरत आहे. ७ मार्च रोजी भगवानगड येथे दिवसाढवळ्या दरोडा टाकून ८० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना होऊन आठ दिवस होत नाहीत, तोचं दि.१७ गुरुवार रोजी मध्य रात्री ते  पहाटे १२ ते ४ वाजेच्या सुमारास सातपूर मधील अशोकनगर परिसरातील चामुंडानगर मध्ये तीन ठिकाणी तर शेजारीच विश्वास नगर मध्ये १ ठिकाणी अशा चार ठिकाणी एका रात्रीत घरफोड्या झाल्या आहेत.

विशेष म्हणजे चोरी झाली त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर बोलकर व्हॅली पोलीस चौकी असून , एक किलोमीटर अंतरावर अशोकनगर पोलीस चौकी आहे.तरी देखील चोरट्यांनी धाडस करून लाखो रुपयांचे मुद्देमाल लंपास केला आहे.त्यामुळे सातपूर परिसरात पोलिसांचा वचक कमी होऊन गुन्हेगारी वाढत असल्याचे सदर प्रकारामुळे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनी स्वतः हून सावधानी बाळगून लग्न कार्य व इतर कामांसाठी गावी जाताना घराला कुलुप न लावता आपल्या जवळच्या विश्वासातील नातेवाईक यांना झोपण्यास सांगावे यामुळे चोरीच्या घटनाना आळा बसेल.परंतु भगवान गड येथे घरात सर्व कुटुंब असताना ओलीस ठेवून दरोडा पडल्याने सातपूरकर भयभीत झाले असून, दरोडेखोर व चोरट्यांचा शोध घेणे सातपूर पोलीस समोर आव्हान ठरले आहे.


बातम्या

Don`t copy text!