नाशिक मिरर वेबटीम : सातपूर  औद्योगिक  परिसरात असलेल्या  राठी फार्म हाऊसच्या परिसरातील  वाळलेल्या गवताला रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली.अग्निशमन दलाच्या जवानांनी  २ तासांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले.  सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही.रविवारी दुपारी राठी फार्म हाऊस परिसरात असलेल्या मोकळ्या माळरानावर असलेल्या वाळलेल्या गवताला आग  लागली ,जोरात वाहणाऱ्या वाऱ्याने आग फार्म हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणात पसरली. फार्महाऊसच्या कर्मचाऱ्यांनी  पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली; मात्र गवत वाळलेले आणि परिसरात वेगाने सुटलेला वारा यामुळे आगीने रुद्रावतार धारण केला. आगीचे स्वरुप वाढत असल्याचे लक्षात येताच अखिल राठी यांनी  अग्नीशमन दलाला माहिती दिली असता,  सातपूर, सिडको, नाशिकरोड या उपकेंद्रांवरुन बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशमन दलाला यश आले.या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने  खोडसाडपणे आग लावल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.या घटनेत जीवित हानी झाली नाही.आग सातपूर,  सिडको व नाशिकरोड येथील चार बंबांच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली.

बातम्या

Don`t copy text!