सातपूर : नाशिक मिरर वेबटीम सातपुर एमआयडीसी मध्ये संतोषी माता मंदीर टेकडीवर कार्तिक स्वामींचे मंदीर आहे.दरवर्षी पौर्णिमेला भाविकांची खुप गर्दी होत असते. पंरतु यावर्षी जगावर कोरोनाचे सावट असल्याने कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक स्वामी महोत्सवाला अतिशय साध्या पद्धतीने प्रारंभ करण्यात आला आहे .ब्रम्हलीन शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांनी घालुन दिलेल्या प्रथा व पूजा पद्धतीनुसार मानसपुत्र  असलेले ज्ञानेश्वर आंधळे यांनी पहाटे दुग्धाभिषेक करुन मुर्तीचे पूजन केले.
यावेळी कार्तिक स्वामींच्या मूर्तिवर तेल,तांदळाचे पीठ,चंदन पावडर,पंचामृत,नारळपाणी,लिंबू रस,उसाचारस,गुलाबपाणी,डाळिंबाचा रस व शेवटी भस्माचा अभिषेक केला जातो.त्यानंतर अलंकार चढविले जातात.दीप आरती केल्यानंतर दर्शन व महाप्रसादाचे वाटप सुरु होते.मात्र यंदा कोरोना चे सावट असल्याने किरकोळ भाविकांनीच दर्शन घेतले.भाविक नोटांवर “ओम” अक्षराद्वारे कार्तिक स्वामींची पूजा करुन हे पैसे आपल्या तिजोरीत अथवा पाकिटात ठेवण्याची प्रथा आहे.दरवर्षी भाविक मोर- पिसांद्वारे कार्तिक स्वामींच्या  पूजनासाठी गर्दी करतात.मात्र यंदा हे चित्र दिसले नाही.कार्तिक पौर्णिमेचे दर्शन रविवारी दुपारी 12:47 पासुन सोमवारी दुपारी 2:52 पर्यंत आहे.तसेच कृतिका नक्षत्रानिमीत्त रविवारी दुपारी 12:47 पासुन सोमवारी सकाळी 6:02 पर्यंत आहे.कार्तिक पोर्णिमेला दीप पूजन केले जात असल्याने कार्तिक स्वामी मंदीरासमोर महिला दीपपूजनासाठी बसतात.मंदिराचे उत्तराधिकारी तसेच मानसपुत्र असलेले ज्ञानेश्वर आंधळे यांनी करोना पार्श्वभूमीवर करोनाविषयी गीते लावत तसेच मंदीर परिसरात जागोजागी नो मास्क नो एण्ट्री अशी फलके लावत व हैण्डवॉश मशीन ठेवत अनोखी जनजागृती केली आहे .तसेच सौ.पंचफुला आंधळे यांनी देखील आलेल्या भाविकांचे सोशल डिस्टन चे पालन करा,मास्क लावा,असे सांगत मोठया आदराने स्वागत केले.
 दरवर्षी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो.मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जात आहे.ब्रह्मलीन शिवचैतन्य स्वामीजी महाराज हे अनेक वर्षांपादीप आराधना,धुप आराधना व पंच आरती याठिकाणी  पार पडली आहे.जगावरचे कोरोना संकट दुर व्हावे हिच कार्तिक स्वामी चरणी आज भक्तगणांसाठी व जनहितांसाठी प्रार्थना केलेली आहे . – ज्ञानेश्वर आंधळे, पुजारी

बातम्या

Don`t copy text!