६५ लाख रुपये आमदार निधी खेळणी साठी मंजुर
सातपूर : नाशिक मिरर वेबटीम
येथील प्रभाग क्रमांक ८ मधील गणेशनगर येथील उद्यानात बसविण्यात आलेल्या लहान मुलांची खेळणीचा लोकार्पण सोहळा लहानबाल गोपाळांच्या शुभहस्ते करण्यात आला .आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतुन सदर खेळणी बसविण्यात आल्या आहेत. यावेळी आमदार सीमा हिरे, भाजपा शहर उपाध्यक्ष रामहरी संभेराव, मंडल अध्यक्ष अमोल इघे, महेश हिरे, संदीप काळे, राजेंद्र चिखले, नारायण जाधव, राजुशेठ शिंदे, दिलीप यादव, दिनेश सावळा, दिनेश रावल, राजेंद्र पाटील, भामरे साहेब, ॲड महेंद्र शिंदे, विशाल ससाणे, अनिल मौले, गोंगे , महिला मोर्चा अध्यक्ष संगीता शेळके, हर्षदा फिरोदीया आदिंच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी सांगितले की, मतदार संघात मोठ्या माणसांसाठी आपण सोयीसुविधा करतो परंतु बालगोपाळ या सुविधांपासुन वंचित राहु नये, यासाठी मतदार संघातील ब-याचशा उद्यानात खेळणी नसल्याने मुलांना खेळण्याचा आनंद घेता येत नाही. तर या लहान बालगोपाळांसाठी देखिल माझ्या आमदार निधीतुन रुपये ६५ लाख रुपये च्या निधी खेळणी साठी मंजुर असुन जवळपास सर्वच प्रभागात एका उद्यानात याप्रमाणे खेळणी बसविण्यात येनार आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी ग्रीन जीम, जॉगिंग ट्रॅक, तरुणांसाठी जिम्नॅशियम हॉल, सभामंडप, तसेच परिसरातील धोकादायक विद्युततारा भुमिगत करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मतदार संघातील प्रलंबित पेलिकन पार्कच्या जागेवर सुसज्ज अद्यावत सेंट्रल पार्कचे काम सुरु असुन, सातपुर येथे बसस्थानक तर सातपुर पोलीस स्टेशन साठी सुसज्ज असे पोलीस ठाणे इमारत त्याचप्रमाणे सोमेश्वर व बालाजी देवस्थान येथे पर्यटन विकास अंतर्गत सुशोभिकरणाची महत्वपुर्ण कामे करण्यात आली आहे.तसेच विद्यार्थ्यांना चांगले अध्ययन करता यावे करिता मतदारसंघातील 6 विभागात 6 अभ्यासिका तसेच स्लम वस्तीतील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन टाकणे, ड्रीनेजची व्यवस्था करणे, सातपुर येथे जलकुंभ बांधणे यासारखी कामे मागील काळात पूर्ण करण्यात आली असुन अजुनही काही कामे प्रगतीपथावर आहे. मतदार संघाच्या विकासासाठी कटीबध्द असुन विकास हाच अजेंडा असल्याने येत्या 5 वर्षात संपूर्ण मतदार संघाचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही याशिवाय मतदार संघातील नागरिकांनी जे जे प्रश्न समस्या मांडल्या त्या सोडविण्याचा तसेच शासनदरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली.
