नाशिक मिरर वेबटीम :  येथे दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.२१ मध्यरात्री घडली.
     सातपूर कॉलनीतील मनाज वाईन  येथे काल दि.२१ रात्री १२.१० वा. नाशिककडून त्रंबकेश्वरकडे डबलशीट सुझुकी अकस्सेसवर जाणाऱ्या एम.एच १५ एच बी ३२८६  या दुचाकीवर असलेले राजू पावरा यांना एम.एच १८ बी.के ४९४७  या दुचाकीने समोरासमोर धडक दिल्याने या भीषण अपघातात  राजू पावरा यास डोक्यास व हाता-पायाला जबर मार लागल्याने पोलिसानी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी जिल्हा रुग्णांलयात दाखल केले असता, डॉ राहुल पाटील यांनी मध्यरात्री मृत घोषित केले.
       तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघा अज्ञातांची  प्रकूर्ती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
     सातपूर पोलिसांनी या अपघाताचा गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोलिस हवा.चव्हाण करीत आहे.

बातम्या

Don`t copy text!