यात्रा निमित्ताने लेजर शो,फायर शो,रहाट पालणे ठरणार आकर्षण ; रविवारी रंगणार कुस्त्या ची दंगल

नाशिक मिरर :

सातपूरचे ग्रामदैवत असलेल्या भवानी माता यात्रोत्सवानिमित आजचा बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.परंतु यावर्षी बारा गाड्यात कोणीही बसू नये असा निर्णय यात्रोत्सव समिती घेतला आहे.१२५ वर्षाची परंपरेस गालबोट लागू नये, यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष लक्ष्मण घाटोळ यांनी केले.सातपूर भवानी माता यात्रोत्सव निमित्त शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सातपूर परिसरात भवानी माता यात्रोत्सवानिमित गेल्या दिडशे वर्षांपासून बारा गाड्या ओढण्याचा उत्सव साजरा केला जातो.पण गेल्या दोन वर्षापासून कोरानामुळे निर्बंध असल्याने उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येतो. यावर्षी सर्व निर्बंध हटल्यामुळे भवानी माता यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.यावर्षी बारा गाड्या ओढण्याचा मान किरण मोहन निगळ यांना देण्यात आला.शनिवारी सायंकाळी ६ वाजेला निगळ परिवारातील गणेशाचे हस्ते पूजन होईल.बारागाड्याचा शुभारंभ पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होईल.यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवांर,आ.सीमा हिरे,आ.देवयानी फरांदे,आ.राहुल ढिकले, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.यात्रा निमित्ताने लेजर शो,फायर शो,रहाट पालणे,असे आकर्षक भारदस्त कार्यक्रम होणार आहे. रविवारी कुस्तीची दंगल होणार आहे.

सुर्यास्ताच्या वेळी गणेशाने बारा गाड्या ओढण्याचा थरार पाहण्यासाठी, कार्यक्रमाची आनंदाने शोभा वाढविण्यासाठी ग्रामस्थ व गावकर्यानी उपस्थित रहावे असे आवाहनाचा सुर बैठकीत उमटला.याप्रसंगी उपाध्यक्ष त्रंबक भंदुरे,राजाराम निगळ,प्रकाश निगळ,दिनेश निगळ,विजय बेंडकोळी, शांताराम निगळ,गोकुळ निगळ, भिवानंद काळे,अमर काळे,सागर निगळ,प्रशांत काश्मिरे, सोपान बंदावणे, कैलास निगळ,,निखील गुंजाळ,सचिन घाटोळ,अनिल जाधव,नितिन निगळ,शशिकांत निगळ,संजय निगळ,दीपक निर्वाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!