नाशिक मिरर वेबटीम : सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.शनिवार दिनांक ३० जानेवारी रोजी शिवजन्मोत्सव समिती सातपूर यांच्या कार्यालयाचा उद्घाटन जाणता राजा मैदान येथे संपन्न होणार आहे.शिवजन्मोत्सव निमित्त समितीच्यावतीने संपूर्ण सातपूर परिसराचे भगवे ध्वज लावू सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सावकार नगर मधील कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी जाणता राजा मैदान येथे उंच स्तंभावर भगवा ध्वज लावला जाणार आहे. दिनांक १८ फेब्रुवारी रात्री परिसरातील महिलांच्या उपस्थितीत शिवरायांचा पाळणा कार्यक्रम संपन्न होणार आहे.दिनांक १९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सव च्या दिवशी समितीच्यावतीने सायंकाळी ७ वाजता शिवपुत्र संभाजीराजे हे महानाट्य सादर केले जाणार आहे. २०१९ मध्ये ‘रयतेचा राजा…जाणता राजा’ तर २०२० मध्ये शिवजन्मोत्सव निमित्त ‘ शिवायन’ हे महानाट्यचे आयोजन केले होते. सातपूर शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने यंदाचे महानाट्य चे तिसरे वर्ष असून सर्व जाती-धर्माचे,सर्व पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन सदर कार्यक्रम यशस्वी करीत आहेत.हे सातपूर कराचे विशेषतः आहे. ७२ फूट भव्य रंगमंच, , मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत कलाकार, विद्युत रोषणाई , आतिषबाजी, घोडे -उंट यांचा वापर, श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा,छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य दाखवणारे महानाट्य विशेषतः राहणार आहे.समितीच्या वतीने शिव पूजनासाठी यावर्षी संभाजी महाराजांचे शौर्य सांगणारा रामशेज किल्ला या ठिकाणाहून माती आणली जाणार आहे. मागील वर्षी मंडळाने शिवनेरी किल्ल्या वरून माती आणली होती.व दर्शनासाठी ठेवली होती.

