इतर मोबाईल चोरीच्या घटना चा उलगडा होण्याची शक्यता
नाशिक मिरर : शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाच्या हातातून आठ हजार रुपयांचा मोबाईल मोटारसायकलीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी चोरून नेल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली आहे.
या घटनेची सातपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की राजेश रामपरसन यादव (वय २७, रा. बिहार, हल्ली रा. सोमेश्वर कॉलनी, एबीबी कंपनीजवळ, सातपूर) हा तरुण सातपूर औद्योगिक वसाहतीत काम शोधत असताना तो शान कार शोरूमसमोर, मोबाईलवर बोलत असताना गणेशनगर परिसरात येणाऱ्या एमएच १५ एफएक्स ७६६६ या क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून आलेल्या तीन भामट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या भामट्याने तरुणाशी बोलण्याचा बहाणा करून त्याच्या हातात असलेला आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. मोबाईल चोरून पळून जात असताना राजेश याने आरडाओरडा केला. व दुसऱ्या च्या मोबाईल वरून १०० नंबर पोलीस कंट्रोल ला फोन केला. आरडाओरडा केल्या मुळे गणेश नगर मधील जागृत नागरिकांनी चोरट्यांनी पकडून ठेवले, परिसरातच गस्तीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंजाळ, जावेद शेख यांना व्हायरलेस द्वारे माहिती मिळाली, यावर पोलीस कर्मचारी यांनी परिसरात शोध घेतला असता नागरिकांनी पकडून ठेवलेले चोरटे गौरव दिलीप ठाकरे (वय २४) जितेश जगन जगताप (वय २१) अनिल दिलीप उशिरे (वय २६) तिघांना अटक करून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार एम. जी. सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत. सदर आरोपीना न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, तपासात शहरातील इतर चोरीच्या घटनामध्ये त्यांचा सहभाग का, इतर मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी वर्तवली आहे.
