नाशिक मिरर :
सातपूर येथील प्रभाग क्र. ११ मधील प्रबुद्ध नगर झोपडपट्टी असून सदर ठिकाणी मनपा प्रशासनाच्या माध्यमातून भुयारी गटारी चे काम एप्रिल २०२१ पासुन सुरु आहे.सदर काम चुकीच्या पद्धतीने सुरू असून, १० हजार लोकसंख्या असलेल्या झोपड़पट्टी मध्ये १० वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने टाकलेल्या पाईप लाइन साईज रुंदी लक्षात न घेता भविष्यातिल गरज व वाढलेली लोकसंख्या याचा विचार न करता केवल ड्रेनेज लाईन नवीन टाकण्यात येत आहे. नवीन लाईन टाकण्यासोबतच पाईपचा व्यास वाढविणे आवश्यक होते.
ठेकेदाराने जुने ड्रेनेजचे पाईप न काढता चेंबर ची साईज व खोली खोल न घेता शेजारीच अगदी दाटीवाटीनेजुन्या ड्रेनेज लाईन ला खेटून ड्रेनेज नवीन लाइन टाकली आहे,सदर कामे भोगस पध्दतीने सुरू काही दिवसानंतर पुन्हा ड्रेनेज तुबण्याची समस्या प्रबुद्धनगर मध्ये सुरू होतील त्यामुळे माजी नगरसेविका ज्योती शिंदे व सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांनी सदर कामाची चौकशी करून ठेकेदार वरून कारवाई करण्याचे निवेदन मनपा आयुक्त कैलास जाधव यांना दिले आहे. यावेळी कैलास सोनवणे,देविदास अहिरे,अशोक पवार,संतोष जाधव,अशोक वाव्हळे,देवराम पगारे,रमेश मोरे,
रामदास पालवे,दिनेश गोटे,संतोष पगारे,गौतम सोनवणे,हरीश सोनवणे आदी नागरिक उपस्थित होते.
