नाशिक मिरर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक पदावर कार्यरत असतांना बाजार समितीच्या पैशांचा अथवा निधीचा हेतू चा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर केल्याने चौकशीअंती जबाबदारी निश्चित केलेली एक कोटी १६ लाख ५७ हजार इतकी नुकसानीची रक्कम देविदास पिंगळे यांच्यासह बारा संचालकांकडून वसूल करण्याचा निकाल जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी सोमवार दि.५ एप्रिल २०२१ ला पारित केला आहे. थकबाकी वसुलीसाठी नासिक तालुका उपनिबंधक फय्याज मुलानी यांची नियुक्ती केल्याचे ही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या या निकालामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधीनियम 1963 व त्याखालील नियम 1967 ए ए रेमिसट्रायकोमधील तरतुदीनुसार झालेली आहे. त्यानुसार बाजार समितीवरील अधीनियमान्वये कामकाज करणे तसेच अधीनियम 1963 व नियम 1967 व समितीचे मंजूर उपविधी त्याप्रमाणे तसेच पणन संचालक यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश व परिपत्रके यांचे पालन करून त्यानुसार कामकाज करणे हे समिती सदस्यांवर बंधनकारक आहे. विभागीय उपनिबंधक यांचेकडील ६ जुलै २०२० रोजीच्या चौकशी अहवालातील नमूद मुद्दा क्रमांक १ मध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निधीच्या नुकसानीबाबत बाजार समितीच्या दप्तरावरून सविस्तर तपासणी घेऊन बाजार समितीच्या निधीच्या नुकसानीस कोण किती प्रमाणात जबाबदार आहे. त्याची जबाबदारी निश्चित करून तसा अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह या कार्यालयास सादर करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक माधव शिंदे (सुरगाणा) यांची नेमणूक केली होती. त्यांनी अधिनियम 1963 चे कलम 53 अन्वये चौकशी अहवाल कार्यालयात सादर केला आहे. सदर चौकशी आदेशातील एक ते तीन मुद्द्यांपैकी मुद्दा क्रमांक २ व ३ मध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्यामुळे चौकशी अधिकारी यांनी एक कोटी 16 लाख 57 हजार इतक्या रकमेची जबाबदारी निश्चित करून तसे आदेश निर्गमित केले आहेत.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री विकास व विनियमन अधिनियम 1963 चे कलम 63 अन्वये मुद्दा क्रमांक 2 व 3 मध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर्थिक नुकसानीच्या एकत्रित तपशील दर्शविणारा तक्ता सदस्यांचे नाव व रकमेची जबाबदारी एकूण निश्चित केली ती रक्कम पुढील प्रमाणे
1) देविदास पिंगळे- नऊ लाख 87 हजार 428 रुपये 57 पैसे,
2)संपतराव सकाळे 10 लाख 1666 रुपये 66 पैसे. 3)युवराज कोठुळे -नऊ लाख 87 हजार 428 रुपये. 57पैसे.
4) दिलीपराव थेटे- नऊ लाख 87 हजार 428 रुपये 57 पैसे.
5)विश्वास नागरे नऊ लाख 87 हजार 428 रुपये 57 पैसे
6 ) तुकाराम पेखळे -15 लाख 67 हजार 428 रुपये 57 पैसे.
7) श्रीमती ताराबाई शंकर माळेकर -9 लाख 87 हजार 428 रुपये 57 पैसे.
8)विमलाबाई भगवान जुंद्रे- पाच लाख 80 हजार. 9)शंकरराव झुंबरराव धनवटे- पाच लाख 80 हजार. 10) संदीप शिवाजी पाटील- पाच लाख पाच लाख 80हजार.
11) रवींद्र तुकाराम भोये- चार लाख 21 हजार 666 रुपये 66 पैसे.
12) अरुण जयराम काळे- 19 लाख 79 हजार 95 रुपये ते 23 पैसे.
जमीन महसुलाची वसुली ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने ही वसुली करावी, असेही खरे यांनी आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. दरम्यान माजी सभापती शिवाजीराव चुंभळे यानी या निर्णयाचे स्वागत करून सत्य परेशान होता है मगर पराजित नही असा मार्मिक टोला लगवला आहे.
