नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्ह्यातील मदर इंडस्ट्री म्हणून नावलौकिक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अंतर्गत युनियन च्या निवडणूकीचा निकाल १३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेनंतर मतमोजणी करून घोषित करण्यात आला. कामगारांनी विद्यमान सत्ताधारी कमेटी ला नाकारत नवीन चेहऱ्याना संधी दिली आहे.नाशिक औद्योगिक वसाहती महिंद्रा कंपनी ची निवडणूक शनिवार दि १३ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ७ या दरम्यान कंपनीआवारातच मतदान घेत एकूण २ हजार २०० कामगार पैकी एकूण २ हजार १७१ (९६%)कामगार मतदान केले.सायंकाळी ८ वाजता मतदान मोजणी सुरू होत रात्री १०वाजता मतमोजणी पूर्ण झाली. विजयी उमेदवार घोषित करण्यात आले. अध्यक्षपदाचे उमेदवार एन. डी.जाधव हे माजी पदाधिकारी असून बाकी सर्व
कामगारांनी नवीन चेहऱ्याना संधी दिल्याचे निकाल वरून दिसून आले. विद्यमान कमेटीस तीन वर्षांचा कालावधी असतांना विविध कारणे देत कार्यकाळ ४ वर्ष वाढवून ७ वर्ष सत्तेवर होते.विद्यमान कमिटी ने स्व: हित जपासत कामगारांच्या प्रश्नांकडे दुलक्ष केल्याचा आरोप नेहमी कामगार करीत होते. निवडणूकित याच मुद्यावर विद्यमान कमिटी धुव्वा उडवत नवीन चेहऱ्याना संधी दिली आहे.
——-
महिंद्रा निवडणूक विजयी उमेदवार व कंसात मिळालेले मते : अध्यक्ष – एन. डी जाधव ( मतदान ९३८),उपाध्यक्ष -संजय घुगे ( मतदान ७९४),जनरल सेक्रेटरी– संजय घोडके ( मतदान५८७ ),
खजिनदार– सचिन मोरे ( मतदान ६६९),जॉईंट सेक्रेटरी -अजित थेटे ( मतदान ४९४), सेक्रेटरी– जितेंद्र सुर्यवंशी , कमिटी सदस्य अ – धनगर माळी( मतदान४२५ ), कमिटी सदस्य ब – संतोष सावकार ( मतदान ९०१ )

