आठवड्यात तिसरी चोरी प्रकार उघड; एबीबी कंपनीत पावणे सात लाखाहून अधिक भंगार चोरीला

नाशिक मिरर : सातपूर औद्योगिक वसाहती मधील एबीबी इंडिया कंपनीतील सुमारे पावणे सात लाखाहून अधिक किमतीच्या भंगाराची चोरी केल्याप्रकरणी चौघांविरोधात पोलिस अंमलदार गोकूळ चंद्रभान कासार यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साहीद आसिक आली, वनजरुल्लाह खान आणि कंपनीतील सुरक्षा रक्षक व वजन काटा करणारा कर्मचारी आशा चौघा संशयितांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. सातपूर येथील औद्योगिक वसाहतीतील एबीबी इंडिया साहीद आसिक अली याने, जे.के इंटरप्रायझेजचे मालक जमीरुल्लाह खान यांच्या सांगण्यावरुन आयशर टेम्पो (एम एच १५ ईजी १६९८) मध्ये कंपनीतील भंगार हे कंपनीतील सुरक्षा वजन काटा करणाऱ्या व्यक्ती आशा चौघांनी संगनमताने मालाची चोरी करुन वजन काटा पावतीत फेरफार करुन कंपनीची फसवणूक केली आहे.सातपूर औद्योगिक वसाहती आठवड्याभरातील ही तिसरी चोरी घटना उघडकीस आली असून पोलिसां समोर चोरट्यांनी आव्हान उभे केले असून, उज्ज्वल भारत कंपनी मधील चोरट्यांचा शोध अद्याप लागलेला नाही.यामुळे सातपूर व अंबड औद्योगिक वसाहती मध्ये सुरू असलेल्या चोरी च्या घटना मुळे उद्योजक व व्यवस्थापक भयभीत झाल्याचे दिसून येत आहे.

बातम्या

Don`t copy text!