नाशिक मिरर : इगतपुरी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विलातील एका बंगल्यात दि . २७ रोजी पहाटे दाेन वाजेच्या दरम्यान रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त खबर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली . मध्यरात्री स्काय विला बंगल्यावर छापा मारला असता यात ड्रग्ज , हुक्का आदि मादक द्रव्यासह बिभत्स अवस्थेत सुमारे २२ जण आढळून आले या रेव्ह पार्टी प्रकरणी १०पुरुष आणि १२ महिलांचा समावेश असून यातील चार महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या व १ महिला बिग बॉस या शोमध्ये काम केले असल्याचे समजते .पोलीसी छाप्यात घटनास्थळहून कॅमेरा, ट्राय पॉड, मादक द्रव्य घेऊन आढळून आल्याने पोलीसांनी ही कारवाई केल्याचे समजते
शहरातील महामार्गा लगत व निसर्ग व डोंगर भागात विविध खाजगी बंगले आणि रिसॉर्ट असुन यात आनेकदा रेव्ह पार्टी व मादक पदार्थाची तस्करी खुल्या आम सुरू असते यात स्थानीक पोलीस व प्रशासनाला अजीबात घाबरत नाही या वरून हॉटेल व खाजगी बंगल्यात कोणाच्या आशिर्वादाने हे काम चालते हे मात्र गुलदस्त्यात आहे.

 

या प्रसंगी छाप्यात संशीयत १० पुरूष व १२ महिलां पैकी अनेक सहकारी हि मिळुन येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली असल्याने काहींनी रात्रीतुनच पळ काढल्याचे समजते .या वेळी कारवाही करताना ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, ग्रामीण महिला पोलिस अधीक्षक शर्मिला वालावलकर, पोलिस उप अधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील,लोहरे, वैभव वाणी, मुकेश महिरे, राज चौधरी, आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!