गावातील पोलीस पाटील च निघाला भक्षक ; वावी पोलिसांनी दाखवली तक्रारीला केराची टोपली

नाशिक मिरर : गावातील पोलीस पाटील म्हणजे गावातील एक शान आणि विश्वास असतो.गावामध्ये सलोखा टिकून ठेवणे, गाव तंटा मुक्त राहावे, व कुणा ही गरीब शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होऊ नये यांची प्रमुख जबाबदारी शासनाने पोलीस पाटील यांच्या वर सोपवलेली असते.परंतु या सर्व गोष्टीना नाशिक जिल्हातील सिन्नर तालुक्यामधील दापुर या गावातील पोलीस पाटील अपवाद ठरले असून, त्यांनी दापुर मधील शेती करणाऱ्या शेतकरी महिला चे कुंपणाने ‘ च खालल्या चा प्रकार घडला आहे.परंतु गेल्या दोन महिन्या पासून न्याय मिळावा म्हणून पोलीस स्टेशन पायऱ्या झिजवून देखील वावी पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सौ सुमन पुंजा इलग राहणार दापुर तालुका सिन्नर दापूर शिवारात शेत जमीन गट नंबर 1919,1920,1924 हे शेत जमीन सन 2017 पासून कसत आहे. तेथे शेतात काम करणाऱ्या गड्यासाठी बांधलेले पत्र्याचे 15 बाय 10 चे घर दि. 17 में 2021 रोजी गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर सुखदेव साबळे यांनी खोलून चोरून नेऊन त्यांचा मित्र दत्तात्रय कोंडाजी सोनवणे यांना विकले.
सोनवणे यांना जाब विचारायला गेले असता त्यांनी पोलीस पाटलांने 3 हजार रुपयाला विकली आहे. असे सांगून पिढीत महिले सोबत हुज्जत घातली. सदर शेडमध्ये शेती उपयोगी वस्तू सात गोणी गव्हाचे धान्य, दोन खताच्या गोणी, पिस्टन ची २०० फूट नळी, शेती साधन, औजरे, पाईप, बॅटरी पंप असे सामान होते. दोन लाखाचा मुद्देमाल ते सर्व सामान पाटलांनी त्यांचा ट्रॅक्टर नंबर MH 15 FT 2380 मध्ये चोरुन नेले.

सदर जमिन पिढीत महिलेचा मयत भाऊ दगडू दादा आव्हाड व त्यांचे एकत्र कुटुंबातील इतर दोन भाऊ त्यांची मुले व पत्नी या सर्वांच्या संमतीने मक्त्यांने कसायला घेतले होते. मोठा भाऊ मयत झाल्यानंतर भावांमध्ये व आमच्यात जमीन वाटपावरून वाद झाले. त्यामुळे पीडित महिला व सर्व बहिणी मिळून वाटपाचा दावा सिन्नर कोर्टात दाखल केला आहे.
त्यानंतर पिढीत महिला सुमन इलग यांच्या मयत भावाची पत्नी व मुलांना दाव्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दिनांक 15 एप्रिल 2021 रोजी तीन चारचाकी गाड्यांमध्ये 10 ते 12 गुंड प्रवृत्तीचे लोक आणून सदर महिलेची काढणीस आलेली उभी पिके ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून टाकले. त्यासंबंधी तक्रार देण्यासाठी वावी येथे गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, नंतर नाशिक येथील पोलीस मुख्यालयात तक्रार दिल्यावर वावी पोलिसांनी दखल पात्र स्वरूपाचा गुन्हा असून देखील आर्थिक हितसंबध जोपासून गुन्हयाचे स्वरूप कमी करून व अदखलपात्र गुन्हा नोंद केली. व आरोपींवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. असे पिढीत महिलेने नाशिक मिरर न्यूज शी बोलतानी सांगितले.

या सर्व घटनांची कल्पना पोलीस पाटलांना होती. तंटामुक्ती समोर वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलीस पाटील हजर होते. तरी देखील त्यांनी घराचे नुकसान केले.पोलीस पाटील हे शासनाचा प्रतिनिधी असून कायदा-सुव्यवस्था राखणे ऐवजी गावात तंटे वाढविण्याचे काम पाटील करीत आहे.गावाचे रक्षक च भक्षक निघाले तर सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची असा मोठा सवाल अशा सर्वसामान्य पिढीत शेतकरी कुटूंबाना पडला आहे.पिढीत महिलेने पोलीस पाटलांवर योग्य कारवाई करून शेती व शेतात असलेल्या पिकाचे झालेले नुकसान , घराचे करण्यात आलेले नुकसान यांची भरपाई मिळवून देऊन आरोपीवर कारवाई करण्याची मागणी पिढीत महिला सुमन इलग यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

 

बातम्या

Don`t copy text!