नाशिक मिरर वेबटीम :  आ . सीमा हिरे यांच्या आमदार निधीतुन प्रभाग क्रमांक २६ मधील आझादनगर येथे रस्ते काँक्रीटीकरण करणे , जाधव संकुल येथील सिध्दीविनायक मंदिर येथे ग्रीज जीम लोकार्पण सोहळा व  भूमिपूजन आज दि.१३ रोजी करण्यात आले.यावेळी आमदार सीमा हिरे, नगरसेवक भागवत आरोटे, मधुकर जाधव, नगरसेविका अलका अहिरे, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील,अमोल इंघे, दिनेश मोडक, आत्माराम मटाले, नंदुशेठ जाधव, यशवंत पवार, अशोक पारखी, लखन कुमावत, विनोद घरटे, सिध्दीविनायक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच हाफिज उल्ला, आली शेख, पपी शेख, भल्लु सेठ, सब्बीर शाह, अब्दुल्ला भाई, नौशाद शाह, करीम लाला, गुलाम शेख आदिंची उपस्थित होते.

यावेळी आमदार सीमा हिरे यांनी मनोगतात सांगितले की, प्रभाग क्रमांक 26 मध्ये जवळपास 4 कोटीची कामे करण्यात आली असुन आठवले नगर येथे रस्ते काँक्रीटीकरण करणे, जाधव संकुल येथे स्वामी समर्थ केंद्रांचा सभामंडप, तुळजाभवानी मंदिर येथे सभामंडप, दत्त मंदिर येथे सभामंडप, भोर टाऊनशिप येथे विरंगुळा केंद्र तर जाधव संकुल येथे व आशिर्वाद नगर येथे ग्रीन जीम अशी विविध स्वरुपाची कामे करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांना विकास हवा असतो त्यामुळे विकास कामे करतांना कोणताही पक्षभेद व मनभेद नको सर्वांना सोबत घेऊन विकास कामे करा आपल्याला मिळालेल्या संधीचा जनतेच्या सेवेसाठी उपयोग करा जनता आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावरच नागरिकांनी मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आझादनगर येथील रस्ते काँक्रीटीकरण करणे तसेच अंगणवाडीची संरक्षक भिंत बांधणे अशी कामे करण्यात आली असुन महिलांसाठी ग्रीन जीम, जॉगिंग ट्रॅक, तरुणांसाठी जिम्नॅशियम हॉल, सभामंडप, तसेच परिसरातील धोकादायक विद्युततारा भुमिगत करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मतदार संघातील प्रलंबित पेलिकन पार्कच्या जागेवर सुसज्ज अद्यावत सेंट्रल पार्कचे काम सुरु असुन, सातपुर येथे बसस्थानक तर सातपुर पोलीस स्टेशन साठी सुसज्ज् असे पोलीस ठाणे इमारत त्याचप्रमाणे सोमेश्वर व बालाजी देवस्थान येथे पर्यटन विकास अंतर्गत सुशोभिकरणाची महत्वपुर्ण कामे करण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांना चांगले अध्ययन करता यावे करिता मतदारसंघातील 6 विभागात 6 अभ्यासिका तसेच स्लम वस्तीतील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन टाकणे, ड्रीनेजची व्यवस्था करणे, सातपुर येथे जलकुंभ बांधणे यासारखी कामे मागील काळात पूर्ण करण्यात आली असुन अजुनही काही कामे प्रगतीपथावर आहे. मतदार संघाच्या विकासासाठी कटीबध्द असुन विकास हाच अजेंडा असल्याने येत्या 5 वर्षात संपूर्ण मतदार संघाचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही याशिवाय मतदार संघातील नागरिकांनी जे जे प्रश्न समस्या मांडल्या त्या सोडविण्याचा तसेच शासनदरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

यावेळी नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेविका अलकाताई अहिरे यांनी देखिल मनोगत व्यक्त करुन प्रभागात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

बातम्या

Don`t copy text!