नाशिक मिरर वेबटीम : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) नाशिक डेपोची शिवशाही बस सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये बिझनेस कम्बाईन कंपनी लगत गेल्या वर्षा भरा पासून उभी असल्याची क्लिप सातपूर सह नाशिक परिसरात सोशल माध्यमातून फिरत होती.याबाबत बातमी मागचं सत्य पडताळून पाहण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने या मागील सत्य जाणून घेण्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय नियंत्रक कैलास पाटील व डेपो व्यवस्थापक किशोर पाटील यांच्या सोबत थेट संपर्क साधून याबाबत अधिक माहिती मिळवली, याबाबत अधिक माहिती अशी की ,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी शिवशाही बस सुरू केली आहे.यातील अनेक बस या खाजगी ट्रॅव्हल कंपनी च्या आहेत. त्यातील एक बस एमएच १४ जीयु ०२२५ ही बस श्री कृपा ट्रॅव्हल (एस.के.ट्रॅव्हल्स )या खाजगी कंपनी ची आहे.सदर कंपनी बस सह इतर काही शिवशाही बस परिवहन मंडळाने फेब्रुवारी २०२० मध्ये कोविड १९ च्या अगोदरच परवडत नसल्याने एग्रीमेंट मधून काढून टाकल्या आहे. सदर ट्रॅव्हल कंपनी ला परिवहन मंडळाने ३ वेळा नोटीस देऊन शिवशाही लोगो,नाव व रंग हटविण्यास सांगितले आहे.परंतु तरी देखील त्याने अद्याप पत्रव्यवहार ची अंमलबजावणी केलेली नाही.सदर बसचा एग्रीमेंट रद्द केले आहे.परिवहन मंडळाचा काही एक संबंध नसल्याचे पाटील यांनी नाशिक मिरर टीम सोबत बोलते वेळी सांगितले.सदर बस मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेल्या अवस्थेत असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बस मध्ये व बस चा आडोसा घेऊन दारू व मद्य सेवन करत असतात असे यावेळी दिसून आले.

 

 सदर कंपनी सोबत बसचे देखील एग्रीमेंट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे ऑपरेशन बंद आहे.केवळ परिवहन मंडळाच्या मालकीच्या बस सुरू आहेत.सदर बस मंडळाच्या मालकी नसून केवळ भाडेतत्वांवर एग्रीमेंट करार करण्यात आला होतो.तो काही अटी व नियम अंतर्गत रद्द करण्यात आला आहे.सदर बस अंडर मेंटनस असून दुरुस्ती साठी लावली असावी.

-किशोर पाटील , डेपो व्यवस्थापक नाशिक

बातम्या

Don`t copy text!