नाशिक मिरर :
सोमनाथ आबा युवा फाउंडेशन, निफाड तालुका व सीतामाई मराठा वधू-वर सूचक मंडळातर्फे वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा, कुणबी, देशमुख तसेच सकल मराठा समाजातील विवाह इच्छुक नव वधू- वर, विधूर,विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या अशा सर्वांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 मार्च 22 रोजी सीतामाई लॉन्स व मंगल कार्यालय, खडक माळेगाव, तालुका निफाड येथे दुपारी 11 ते 4 या वेळेत हा मेळावा संपन्न होईल. इच्छुक वधू-वर व पालकांनी सदर मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी 7588270691 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डी.के ठाकरे यांनी केले आहे. सदर मेळाव्यात आमदार अनिल कदम, मा.आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, चांदवड कृऊबा सभापती आत्माराम कुंभार्डे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
