नाशिक मिरर वेबटीम : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सातपूरमध्ये थोर समाज सुधारक व शिक्षण तज्ञ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रतिमापूजन विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव पाटील, अभिनव बाल विकास मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका निलम देशमुख, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका उषा कदम, संस्थेचे माजी शिक्षणाधिकारी व विदयालयाचे पर्यवेक्षक रमेश तासकर, प्रमोद कांगुणे श्रीम.एम.एम. कसबे या मान्यवरांच्या हस्ते पार पडले.अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी शिक्षणाधिकारी व विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश तासकर होते .अभिनव बाल विकास मंदिर विभागाच्या उपशिक्षिका माधुरी पिंगळे , पुष्पा भवर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म, बालपण , एकोणिसाव्या शतकातील इंगजांचा कालखंड स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांच्या शिक्षणाबाबत असणारे महत्वाचे शैक्षणिक व सामाजिक कार्य या विषयी माहिती सांगितली.अध्यक्षिय मनोगतात तास कर सरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली पुण्यात पहिली मुलींसाठी सुरू केलेली शाळा , स्त्रीयांचे शिक्षण , स्त्रीयांसाठी समानता स्वातंत्र्य , व जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली . कार्यक्रमास विद्यालयातील सांस्कृतिक मंडळातील सदस्य , कला ,क्रीडा, अभिनव बाल विकास मंदिर विभाग आणि माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली धोंडगे यांनी केले तर आभार अभिजिता देवरे यांनी मानले.
