नाशिक मिरर वेबटीम : येथील छत्रपती शिवाजी मंडई परिसरात दि.३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या  अतिक्रमण पथकाच्या कर्मचारीच्या शर्टाची कॉलर पकडून वाहन जाळुन टाकण्याची धमकी देण्यात आली. संबंधित व्यक्ती च्या  विरोधात सातपूर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
     याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेचे  अतिक्रमण विभागाचे कर्मचारी रविंद्र अर्जून काथवटे हे रात्री ९ वाजेपर्यंत या परिसरामध्ये अतिक्रमण होवू नये यासाठी ड्युटीवर होते.
      फकीरा डंबाळे या भाजी विक्रेत्या तरुणास अतिक्रमण करू नको.अन्यथा कारवाई करावी लागेल अशी सूचना केली असता, संबधीत विक्रेत्यांने कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी ची गच्ची पकडून शिवीगाळ करीत तुझी गाडी जाळून टाकेन अशी धमकी देखील दिली. या तक्रारीवरुन सातपुर पोलिसांनी ३७९ अन्वये तक्रार दाखल केली आहे.

बातम्या

Don`t copy text!