नाशिक मिरर वेबटीम :  श्रमिकनगर परिसरातील  आय टि आय काँलनी येथे काल पासून भुयारी गटार तुबंल्याने सर्वत्र घाण पाणी रस्तावर पसरून दुर्गंधी पसरली आहे.या परिसरात वारंवार गटार तुुंबत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.या समस्येकडे प्रभागातील नगरसेवकांसह मनपा अधिकारी कानाडोळा करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मनपा प्रशासनाकडे तक्रार करून देखील केवळ बघ्याची भूमिका मनपा प्रशासनाने घेतली आहे.ठोस पाउल उचलून ही समस्या कायम स्वरुपी सोडवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
                            सातपूर परिसरातील श्रमिकनगर या ठिकाणी गटारी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे गटारीचे घाण पाणी रस्त्यावर साचत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न शहरात निर्माण होत आहे.याबाबत वारवार तक्रार करूनही काही ठोस काम होत नसल्याने नागरिकांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे.तसेच अशोकनगर राधाकृष्णनगर,विश्वासनगर,
श्रमिकनगर आदी  ठिकाणी कायम ही समस्या निर्माण होते.गटारीचे पाणी मोकळ्या जागेत साचते.यामुळेे डासाच्या प्रमाणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.या समस्याची नगरसेवकाकडे तक्रार करूनही नगरसेवक काहीच दखल घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहेे.श्रमिकनगर  या भागातील अनेक भुयारी गटारांचे घाण पाणी अनेकदा रस्त्यावर आले.यामुळे परिसरात घाण व दुर्गधी पसरली होती.श्रमिकनगर परिसरात एक नैसर्गिक नाला नागरी वसाहतीत तून जात असून त्याच ठिकाणी भुयारी गटारीचे घाण पाणी नैसर्गिक नाल्यातून सोडले आहे.तेथे राहत असलेल्या नागरिकांना घाण पाण्याचा वासाचा त्रास कित्येक दिवसापासून सहन करावा लागत आहे.त्यातच डासांचे प्रमाणही खुप प्रमाणात वाढले आहे.लोकप्रतिनिधी दिवसभरात त्याच रस्त्याने जात असतात पण याकडे त्याचे साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

बातम्या

Don`t copy text!