नाशिक वेब टीम : नाशिककरा साठी एक सुखद वार्ता असून नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९९ हजार ९५९ कोरोना बाधीतांना बरे करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोरोना मुक्ती मध्ये महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्हा आज वरच्या स्थानी असून नाशिककरांनी संयम ठेवून काळजी घेतल्यास नाशिक कोरोना मुक्त जिल्हा असेल यांत शंका नाही.नाशिक मधील नागरिक कोरोना पासून भयमुक्त झाले असून निष्काळाली पणारे देखील वागत आहे.मास्क सह इतर नियमांचे पालन करतानी दिसत नाहीत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ५१२ रुग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत १ हजार ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २२२, चांदवड ६४, सिन्नर २३०,दिंडोरी ६५, निफाड २१३, देवळा २०, नांदगांव ६७, येवला ०९, त्र्यंबकेश्वर २०, सुरगाणा ०१, पेठ ००, कळवण ३५, बागलाण १४७, इगतपुरी १८, मालेगांव ग्रामीण २० असे एकूण १ हजार १३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २०४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५२ तर जिल्ह्याबाहेरील २५ असे एकूण ३ हजार ५१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५ हजार ३३५ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९३.९९, टक्के, नाशिक शहरात ९५.४७ टक्के, मालेगाव मध्ये ९२.७२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.६० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.९० इतके आहे.
एकूण मृत्यु :
नाशिक ग्रामीण ७१५ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७२ व जिल्हा बाहेरील ४४ अशा एकूण १ हजार ८६४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
◼️१ लाख ५ हजार ३३५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९९ हजार ९५९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३ हजार ५१२ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण
९४.९० टक्के
(वरील आकडेवारी आज सकाळी ११.००वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)
