मुंबई, नाशिक मिरर वेबटीम दि. १४ : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी ११ वाजता तर विधानपरिषदेच्या कामकाजाची सुरुवात दुपारी १२ वाजता ‘वंदे मातरम्’ ने करण्यात आली.
विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी केली. आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, संजय शिरसाट, ॲड. अशोक पवार, संग्राम थोपटे यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
