राजरोसपणे सुरू होतो शौचालय मध्ये भंगार व्यवसाय 
सातपूर : नाशिक मिरर वृत्तसेवा
सातपूर परिसरात नूतन प्रभाग सभापती रवींद्र धिवरे  यांच्या पाहणी दौऱ्यात शिवाजी नगर मधील होळकर चौकातील मनपाच्या सार्वजनिक शौचालयात तर चक्क भंगाराचे दुकानच  सुरू असल्याचे दिसून आले.यामुळे सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे.मनपा प्रशासनाच्या कामकाज वर प्रश्नचिन्हनिर्माण झाले आहे. भंगाराचा व्यवसाय मनपा प्रशासनाचा की अन्य व्यक्ती असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधिल नगरसेवक दिनकर पाटीलशिवाजी नगर, ध्रुव  नगर,  परीसरात प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांच्यासह मनपातील सर्व विभागांचे अधिकारी यांचा प्रभाग ९ मधिल विवीध समस्यांचा  पहाणी दौरा करत असताना होळकर चौकातील मनपाच्या  सार्वजनिक
शौचालयातील बंद घराचे कुलूप तोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात साठवलेले भंगारचे गोडाऊन दिसून आले, शौचालय लगतच्या पत्र्याचे शेड उभारुन भंगारचा धंदा सुरू असल्याने दिसल्याने त्वरित अतिक्रमण तोडण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी की,नगरसेवक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक ९ मधिल शिवाजी नगर, धुर्व नगर, श्रमिक नगर आदि परीसरात प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांच्यासह मनपातील सर्व विभागांचे अधिकारी यांचा प्रभाग ९ मधिल विवीध समस्यांचा आज पहाणी दौरा दि.२७ रोजी आयोजित करण्यात आला होतो.
           मनपाने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या विविध उद्यांनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले गाजर गवत, कचरा, नियमित साफसफाई होत च नसल्याने फक्त गार्डन फक्त नावालाच उरले असल्याचे दिसून आले.शिवाजी नगर होळकर चौकातील मनपाच्या सार्वजनिक शौचालयात तर चक्क भंगाराचे दुकानच थाटण्यात आले होते, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या सुचनेनुसार शौचालयातील बंद घराचे कुलूप तोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात साठवलेले भंगारचे गोडावुणच उघडकीस आले, शौचालय लगतही पत्र्याचे शेड उभारुन भंगारचा धंदा सुरू असल्याने यावेळी उपस्थित अधिकार्यांना  ”हा मनपा प्रशासनाचा भंगारचा धंदा आहे का..?” असा प्रश्न विचारताच विभागीय अधिकार्यांच्या आदेशाने लगेच भंगारच्या धंद्याचे अतिक्रमण काढण्यात आले.प्रभागातील एका उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे सांडपाणी सोडल्यामुळे उद्यानाचे गटाराचेच रुपांतर होवुन मोकाट जनावरांसाठीच हे उद्यान मनपाने बांधले असावे असेच चित्र दिसून आले. शौचालयाची दुग्रंधी, विविध ठिकाणी कचरा साचलेले ब्लॅक स्पाॅट, रस्त्यांवर दुरुस्ती अभावी वाहणारे पाणी, उघड्यावर सर्रास सुरू असलेली मांस विक्री, ठिकठिकाणी आढळणारे अतिक्रमण, आदी समस्या प्रभागात निर्माण झाल्या असताना अधिकारी आणि कर्मचारी कुठल्या कामाचा पगार घेतात असा प्रश्न सभागृह नेते दिनकर पाटील यांनी उपस्थित केला आहे.
सातपूर : १.प्रभाग पाहणी द्वारा दरम्यान समस्या ची पाहानी करतेवेळी नगरसेवक दिनकर पाटील, सभापती रवींद्र धिवरे, अमोल पाटील
सातपूर विभागातील आरोग्य विभागात कर्मचारी किती असा प्रश्न उपस्थित झाला असून शिवाजीनगर परिसरातील आरोग्य उद्यान स्वच्छता पाणीगळती उघड्यावर मांस विक्री अतिक्रमण तसेच प्रभागात होत असलेल्या शालेय इमारती चे काम आदी विषयांबाबत अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले असून लवकरात लवकर ही कामे मार्गी लावावी.- रवींद्र धिवरे ,सभापती सातपूर 

बातम्या

Don`t copy text!