८० फूट उंचीवरील पत्र्यावर काम करत असताना सिमेंट पत्रा फुटल्याने मृत्यू 
नाशिक मिरर वेबटीम :  सातपूर औद्योगिक वसाहतीमधील ग्राफाईड इंडिया लिमिटेड (कार्बन) कंपनीमध्ये गुरुवार दि.२४ रोजी  कार्बन कंपनीच्या कामगाराचा सलमान पिंजारी( वय २३ रा.स्वारबाबानगर सातपुर )
कामावर असतांना पत्र्यावरती काम करत असतांना सिमेंट पत्रा तुटुन तो ८० फूट खाली कोसळला.त्यास उपचारासाठी नेत असतांना त्याचा दुर्देवी मृत्यु झाला.सोबतच्या असलेल्या नातेवाईक कामगारांनी त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
सदर कंपनीत यापूर्वी देखील असे ३ अपघात घडले आहेत. कंपनीमध्ये कार्बनचे उत्पादन केले जाते. कंत्राटी कामगारांना कोणत्या प्रकारचे सुरक्षा साधने पुरवले जात नाही, अथवा सुरक्षे विषयीचे नियम पाळण्यात येत नसल्याचे समजत आहे. परंतु  तरी देखील राज्य शासनाचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. आजही सातपूर-अंबड सह इतर औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी कामगारांना सुरक्षा विषयी साधने पुरवले जात नाहीत. त्यामुळे सदर कंपनी व्यवस्थापनास जबाबदार धरून सदर कामगाराच्या कुटुबांस नुकसान भरपाई आणि नियमाचे उल्लगन केल्या मुळे योग्य ती कारवाई करण्याची मागणी सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी केली आहे.

बातम्या

Don`t copy text!