वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने घेतला गळफास
  नाशिक मिरर वेबटीम :   सातपुर मधिल महादेवनगर परिसरातील उज्वला एकनाथ गांगुर्डे  (वय १३ सातवी इयत्तेत  शिकत असलेली)  हिने आपल्या वडिलांकडे गावी जाण्यासाठी पैशाची मागणी केली परंतू आपल्या वडिलांनी उज्वला हिला पैसे देण्यास नकार दिल्याने तिला राग आल्याने तीने आपल्या  राहत्या घरात आज दि.२४ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.उज्वला हिचे वडिल थंडी मुळे घराबाहेर उन्हामध्ये बसलेले असतांना ही घटना घडली .तिच्या परिवारात आई,वडिल,एक भाऊ,आणि एक बहीण असा परिवार आहे.यामुळे सातपुर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .अधिक तपास सातपुर पोलिस हवालदार सय्यद हे करित आहे.

बातम्या

Don`t copy text!