नाशिक मिरर वेबटीम : निफाड प्रदीप कापसे
जागतिक ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शाश्वत निसर्गपुरक जीवनपद्धती अवलंबविण्यासाठी ‘माझी वसुंदरा अभियान’ उपकरण राबविण्याचा निश्चित केले आहे. त्यासअनुसरून निफाड नगरपंचायत परिसरात सायकल रॅलीचे आयोजना करण्यात आले होते.त्याप्रसंगी सर्व कर्मचारी ,अधिकारी व नागरिक ह्यांनी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. डॉ. श्रीया देवचके ह्यांनी पर्यावरणाबाबत महत्व पटवून देतांना म्हटले की झाडे लावा झाडे जगावा व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवावी ,प्लास्टिकचा वापर करू नये, पाण्याचा वापर, बोअरवेल व विहिरींचे पुनर्भरण , वीज , पेट्रोल, डिझेल काटकसरीने करण्यास सांगितले. पृथ्वी , वायू, जल, अग्नी व आकाश ह्या पंचमहाभूतांचे रक्षण केले. तरच आपल्या वसुंदरेला आपण वाचवू शकतो नाहीतर, तिला नष्ट होण्यात वेळ लागणार नाही पृथ्वीवरील जीवश्रुष्टी नष्ट होईल. वाहनांचा कमीत कमी वापर व त्यास पर्यायी म्हणून सौरऊर्जेचा वापर ही अधिक निरोगी आयुष्य देण्यात मदत होईल. माझी वसुंदरा अभियाना अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करून निफाडचे प्रदूषण कमी करण्यास नक्कीचं हातभार लागेल अशी आशा उपस्थित मान्यवरांनी केली.
ह्या प्रसंगी उपविभागीय अधिकारी मा.अर्चना पखरे, पोलीस उपअधीक्षक श्री. तांबे साहेब , तहसीलदार श्री .शरद घोरपडे, पोलीस निरीक्षक सानप साहेब, बी .दि.ओ. संदीप कराड, डॉक्टर असो.चे सर्व डॉक्टर, नगरपंचायत पदाधिकारी, आदी उपस्थित होते.रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी चौकातुन होऊन नगरपंचायत कार्यालय येथे समाप्त झाली. अनेक मान्यवर व रॅलीतील बालकांचा फुल देऊन सत्कार करण्यात आला व सप्ताहातील दर बुधवारी ‘NO VEHICLE DAY’ पाळण्याचा निश्चय निफाड नगरपंचायतीतर्फे मुख्या अधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी आव्हान केले. व उपस्थित अतिथींचे आभार मानले.

बातम्या

Don`t copy text!