स्वीकृत नगरसेवक शोभेला आहेत का?

प्रभाग बैठकीत कामे होत नसल्याने नगरसेवकांची अधिकाऱ्यांवर नाराजी

नाशिक मिरर वेबटीम :  सातपूर विभागात ठिकठिकाणी अतिक्रमणाचा विळखा पडत आहे, तरी त्याचे सोयरे सुतक नसलेला सातपूरचा अतिक्रमण विभाग केवळ हप्तेखोरीसाठी कार्यरत असल्याचा थेट आरोप नगरसेवक भागवत आरोटे यांनी प्रभाग बैठकीत केला आहे. प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी प्रभाग सभा संपन्न झाली. सातपूर मनपा कर्मचारी मोईन खान व माजी नगरसेविका सुवर्णा मोराडे यांच्या सासू छबाबाई मोराडे यांना श्रद्धांजली अर्पण करत पाच मिनिट तहकुब केलेली बैठक यावेळी प्रभाग २६ मध्ये उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. सरार्सपणे उघड्यावर मास विक्री व मोठ्या जनावरांचा कत्तलखाना सुरु असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने  उघड्यावर मास विक्री करणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आरोटे यांनी केली. प्रभागात मोकाट कुत्र्यामुळे नागरिक दहशतीखाली असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी योगेश शेवरे यांनी केली. यावेळी नगरसेविका दिक्षा लोंढे, नयना गांगुर्डे, समिती सदस्य विजय भंदुरे यांनी समस्या मांडत अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.दरम्यान, बैठकीत धुरफवारणी ठेकेदाराच्या अति शर्तीची विचारणा केली असता अधिकाऱ्यांना उत्तर न देता आल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ठेका रद्द करण्याची मागणी केली.तसेचसातपूर प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड केलेल्या सदस्यांचे कामे होत नसल्याने हे पद शोभेसाठी आहे का? असा सवाल उपस्थित करत समिती सदस्य दशरथ लोखंडे यांनी त्या आशयाचा फलकच बैठकीत झळकावून कामे न कारणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.सातपूरला 70 लाखाचे डिलक्स व व्हिंटेज बेंचेस आजच्या प्रभाग बैठकीत विभागातील प्रभाग क्रमांक 8,10,11 व 26 मध्ये 70 लाख 10 हजार 424 रुपयांचे डिलक्स व व्हिंटेज बेंचेस बसविण्याच्या कामास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली आहे.

बातम्या

Don`t copy text!