नाशिक मिरर :
प्रभाग क्रमांक ९ मधील गुंठेवारी हा परिसर नवीन झाल्याने त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून लाईटचा प्रश्न उभा राहिला होता.प्रभाग क्रमांक ९ च्या कर्तव्यदक्ष नगरसेविका हेमलता कांडेकर यांनी सातत्याने महापालिकेत पाठपुरावा करून आज तेथील लोकांचा लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणला. गुंठेवारी परिसरातील अनेक प्रश्न आतापर्यंत हेमलता कांडेकर यांनी पाठपुरावा करून सोडवले आहेत . परंतु या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना अनेक दिवसापासून लाईट, पाणी, रस्ता या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत होत्या. त्यापैकी नगरसेविका हेमलता कांडेकर यांच्या माध्यमातून तेथील पाण्याचा व लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी त्यांना यश आले. या स्ट्रीटलाइट चे उद्घाटन छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, विद्युत अभियंता सातपूर विभाग अफसर खान, नगरसेविका हेमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, साहेबराव जाधव, सौ सविता गायकर, बाळा जारे, विकास दळवी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले .या वेळी तेथील नागरिकांनी बोलताना सांगितले की ,आमचा हा भाग दुर्लक्षित होता परंतु ताईंच्या माध्यमातून आमच्या या भागाला आज चांगले दिवस येत आहेत . काही लोक काम न करताच फक्त येऊन मी केलं, मी केलं ,असा गवगवा करतात आणि स्वतःची प्रसिद्धी वाढवण्याचा प्रयत्न करतात परंतु ताई आपण स्वतः वेळोवेळी या ठिकाणी येऊन आमच्या या भागाच्या समस्या जाणून घेतल्या त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
त्याबद्दल आम्ही सर्व रहिवासी आपले कायम ऋणी राहू आपल्यासारख्या लोकप्रतिनिधी आम्हाला आमच्या या भागाला मिळाल्या त्याबद्दल आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. परंतु तुम्ही केलेले काम काही नगरसेवक दादागिरी करून स्टंटबाजी करून आम्हीच केले असा दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात परंतु आज आपण आपल्या कामातून हे पुन्हा एकदा सिद्ध केले सूर्य हा तळहाताने झाकत नसतो. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तेथील जनसमुदायाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना सांगितले की तुमचा परिसर निश्चितपणे स्मार्ट सिटी प्रमाणे करून देण्याचा निश्चय आणि शब्द दिला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

