नाशिक मिरर :

नाशिक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिर ट्रस्ट,अखिल भारतीय मराठा महासंघ आणि क्रिडा सांस्कृतिक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध दैनिकात काम करणाऱ्या पत्रकार तसेच प्रतिनिधींचा पत्रकारदिनाच्या पूर्वसंध्येला सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिराचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली.

ग्रामदैवत कालिका मंदिर ट्रस्टच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात येत असतो याच दिवशी पत्रकारीता क्षेत्रात काम करणाऱ्या माध्यमप्रतिनीधींचा गौरव करण्यात येत असतो गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीत पत्रकारांनी आपल्यासह आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून पत्रकारीता केली आहे यामुळे या पत्रकारांचे कौतुक करावे तितकेच थोडे आहे अशा धाडशी पत्रकारांचा पत्रकारदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि ५जानेवारीला सांय. ४वाजता कालिका मंदिर सभागृहात करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन कालिका मंदिर ट्रस्टचे खजिनदार सुभाष तळाजीया सचिव डॉ प्रतापराव कोठावळे,अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बनकर, क्रिडा सांस्कृतिक फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष अशोक दुधारे ,आनंद खरे ,उदय खरे, आदींनी केले आहे.

 

सत्कार मूर्ती : 

पत्रकार तुषार जगताप (दै नवराष्ट्र) सचिन दिवटे(एनसीएन )
किरण आहेर (एम एच15) दामोदर थोरात (न्युज इंडीया 27)योगेश गांगुर्डे (दै पुण्यनगरी) नामदेव पवार(दै म हाराष्ट्र टाईम्स )सतिश निकुंभ( दै सकाळ) रविद्र केडीया (दै देशदुत) भाई(दिलीपराज)सोनार( दै आपलं महानगर )रविंद्र एरंडे (साप्ताहिक सन्मान युग) सतिश पाटील( दै पुण्यनगरी) मनोज घोणे( दै दिव्यमराठी) प्रतिक देशमुख (दै पुण्यनगरी) सुधीर उमराळकर(दै आपलं महानगर) विजय आव्हाड (दै आपलं महानगर) सतिश नांदोडे (पुण्यनगरी) साई पाटील(दै आपलं महानगर)मनिष कटारीया(दै आपलं महानगर) किरण कवडे(दै आपलं महानगर) अरुण मुलाणी ( दै सकाळ) ,योगेश मोरे(दै सकाळ ) रविंद्र आखाडे(दै पुढारी) संतोष लोळगे (नाशिकनामा) फारुक पठाण (देशदुत) दिपक भावसार (भ्रमर) मनोहर पाटील (लोकराजकारण) मदन बोरसे(नवराष्ट्र) दिनेश जाधव
( लोकनामा)फारुक पठाण( दै देशदुत) एजाज शेख (छायाचित्रकार)

बातम्या

Don`t copy text!