एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडीतील लहान मुले,गरोदर ,स्तनदा माता यांना पोषण आहार किटचे वाटप

टाकेद खुर्द : नाशिक मिरर वेबटीम।  इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत टाकेद खुर्द घोरपडे वाडी येथील सर्व अंगणवाडीतील लहान मुलांना,गरोदर माता,स्तनदा माता यांना एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत एक मूठ अभियान उपक्रमांतर्गत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी सरपंच सचिन बांबळे, उपसरपंच कुसुम पांडे, ग्रामपंचायत सदस्य आरती लगड, अशोक धोंगडे, हरी जोशी, ग्रामविकास अधिकारी चौधरी भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी पंढरी पांडे , धोंडु वाघ, आदींसह अंगणवाडी सेविका शिला लगड व लाभार्थी महिला माता भगिनी उपस्थित होत्या.

बातम्या

Don`t copy text!